साताऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा- सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहयोगातून आणि मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवानिमित्त दि. ८ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सूनिशा शहा आणि एक कोशिश संस्थेच्या अध्यक्षा रेणू येळगावकर यांनी दिली आहे.
दि. 8 व 9 ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल (वरचे ग्राउंड) येथे, सातारा - जावली मतदारसंघातील युवती व महिलांसाठी भव्य रास दांडिया आणि गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे .ह्या दोन दिवसीय दांडिया महोत्सवात सातारा आणि जावलीतील सर्व अंगणवाडी सेविका, आशाताई तसेच बचत गटातील सर्व महिला व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या महोत्सव फक्त महिलांसाठी असून यामध्ये सर्व महिलांना प्रवेश मोफत दिला जाणार आहे. महिलांना आवश्यक गृहउपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज, आटाचक्की, वॉटर प्युरिफायर, गिझर, मिक्सर, स्मार्ट वॉच, टॅबलेट मोबाईल अशी अनेक बक्षिसे लकी ड्रॉ चे स्वरूपात महिलांमध्ये वाटण्यात येणार आहेत. बेस्ट दांडिया ग्रुप डान्स, बेस्ट गरबा ग्रुप डान्स, बेस्ट सोलो डान्स, बेस्ट जोडी डान्स, बेस्ट आई आणि मुलगी जोडी, बेस्ट ड्रेपरी, बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट दांडिया क्वीन, बेस्ट गरबा क्विन अशा असंख्य बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. तरी, सर्व युवती व माता - भगिनींनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. १३ रोजी कला व वाणिज्य ग्राऊंड येथे सायंकाळी ५ वाजता रील स्टार अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित यांचा भरपूर धमाल मस्ती कॉमेडी एंटरटेनमेंट कार्यक्रम आणि रिल्स बद्दलची माहिती हा कार्यक्रम होणार असून रील करिअरसाठी खूप उपयोगी मार्गदर्शन मिळणार आहे. हाही कार्यक्रम विनामूल्य आहे.
दि. १७ रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हॉल मध्ये दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत सौंदर्य शक्ती हा विशेष पार्लर, मेकअप आर्टिस्ट ब्युटी इन साईड आउट, डायट ह्या विषयांवर माहिती देणारा कार्यक्रम होणार आहे. यासाठीही प्रवेश विनामूल्य आहे. दि. २० रोजी पोलीस करमणूक केंद्र, सातारा येथे सकाळी ९ ते रात्री ८ या कालावधीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये थायरॉईड, एचबी मोफत तपासण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#satara
#chhatrapati
#छत्रपति
#maharashtra
#shetkari
#satarakar
#sataracity
#ajinkyatara
#rajdhanisatara
#maratha
#marathi
#राजधानी_सातारा
#satara #satarabjp
#bjpmaharashtra
#Bjp4Maharashtra
#Bjp4Satara #Satara
#Chatrapati #छत्रपती
#Shivendraraje4Satara
#ShivendraRajeFC
#SHivendraRajeforSatara